Entertainment

विक्की कौशल व सारा खानने घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन

by Suman Gupta

मुंबई, दि. ७ जून : प्रभादेवी येथील सुप्रसिद्ध श्री. सिद्धीविनायक मंदिराला बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि सारा अली खान या दोघांनी भेट देऊन गणपती बाप्पाचा आशिर्वाद घेतला. विक्की व साराने यावेळी मंदिरात उपस्थित असलेल्या भक्तांना प्रसाद वाटप केले, श्री. सिद्धीविनायक मंदिराचे विश्वस्त राजाराम देशमुख यांनी ही माहिती दिली.

अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री सारा खान यांच्या ‘जरा हटके, जरा बचके’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने विक्की व साराने सिद्धिविनायक मंदिरात येऊन बाप्पाची पूजा केली व आशिर्वाद घेतले. यावेळी देवस्थानचे विश्वस्त राजाराम देखमुख यांनी विक्की व साराचे स्वागत केले व चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदनही केले. विक्की व साराला पाहण्यासाठी यावेळी चाहत्यांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती.

Related posts

Humaramovies Launches Mukesh Jasoos on Disney + Hotstar

Haresh Vyas’s dream project “Rizwan” took it’s first step towards release.

A Benarasi local inspires Shalin’s look for his web series

Leave a Comment

+ 22 = 27