Uncategorized

केअरने गरवारे पॉलिस्टरला आउटलूक स्टेबलवरून पॉझिटिव्ह केला; बँक सुविधांसाठी पुन्हा दिले “केअर ए” रेटिंग

by Suman Gupta

मुंबई, ऑक्टोबर 13, 2020: केअर रेटिंग्ज या भारतातील आघाडीच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीने गरवारे पॉलिस्टर लिमिटेडला पुन्हा एकदा केअर ए हे रेटिंग दिले आहे आणि आउटलूक स्टेबलवरून पॉझिटिव्ह असा सुधारला आहे.

गरवारे पॉलिस्टर लिमिटेडच्या (जीपीएल) बँक सुविधांना दिलेल्या रेटिंगमध्ये पॉलिमर मूल्यसाखळी उद्योगातील जीपीएलची पाच दशकांची कामगिरी, वैविध्यपूर्ण उत्पादने, जगभर व्यापक भौगोलिक विस्तार व एकात्मिक उत्पादन सुविधा यांचा विचार करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये, उच्च क्षमतेच्या सातत्यपूर्ण वापरातून ऑपरेटिंग कामगिरीमध्ये सुधारणा झाल्याचे अधोरिखेत झाले आहे. तसेच, मूल्यवर्धित उत्पादनांवर अधिक भर देण्यात आल्याने ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन वाढले आहे (आर्थिक वर्ष 20 व आर्थिक वर्ष 21 मधील पहिली तिमाही) आणि त्याची दखल रेटिंगने घेतली आहे.

कर्जाची ठरलेल्या मुदतीत परतफेड केल्याने आर्थिक वर्ष 20 मध्ये संबंधित निर्देशांकांमध्ये सातत्याने सुधारणा झाल्याची दखल रेटिंगने घेतली आहे.

रेटिंग वाढल्याबद्दल बोलतानाजीपीएलचे अध्यक्ष एस. बी. गरवारे म्हणाले, “रेटिंगमध्ये झालेली सुधारणा हे जीपीएलच्या उत्तम कामगिरीचे प्रतिक आहे. केअर रेटिंग्जने जीपीएलची पॉलिस्टर उद्योगातील स्पर्धात्मक क्षमता आणि काम करण्याचे मापदंड विचारात घेतले आहेत.

दीर्घकालीन बँक सुविधा 369.81 कोटी रुपये (288.97 कोटी रुपयांवरून वाढ) केअर ए / पॉझिटिव्ह. अल्पकालीन बँक सुविधा (198.19 कोटी रुपये) रेटिंग केअर A1.

गरवारे पॉलिस्टर लिमिटेड

गरवारे पॉलिस्टर लि. (जीपीएल) ही गरवारे समूहाची प्रमुख कंपनी आहे. जीपीएल ही कंपनी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. बी. गरवारे यांनी 1957 मध्ये संस्थापक अध्यक्ष दिवंगत पद्मभूषण डॉ. भालचंद्र गरवारे यांच्यासह को-प्रमोट केली.

कंपनीने भारतामध्ये पॉलिस्टर फिल्मसाठी इन-हाउस तंत्रज्ञान विकसित केले आणि पॉलिस्टर फिल्म निर्माण करण्यासाठी 1976 मध्ये भारतातील महाराष्ट्र राज्यातील औरंगबाद येथे पहिला अद्ययावत उत्पादन प्रकल्प सुरू केला. अशा प्रकारचा आग्नेय आशियातील हा पहिलाच प्रकल्प होता. पॅकेजिंग, इलेक्ट्रिकल व मोटर आणि केबल इन्सुलेशन, लेबलसाठी श्रिंक फिल्म, विंडो टिंटसाठी कलर्ड पॉलिस्टर फिल्म, सिक्विन, टीव्ही स्क्रीन, सुरक्षा अशा विविध वापरांसाठी पॉलिस्टर फिल्मचे उत्पादन करण्यासाठी पॉलिस्टर चिप्स हा स्वतःचा कच्चा माल स्वतःच तयार करणारी ही पहिलीच कंपनी आहे.

कंपनीचे पॉलिस्टर फिल्मसाठी चार उत्पादन प्रकल्प आहेत आणि कंपनी 10 मायक्रॉन ते 350 मायक्रॉन या जाडीच्या फिल्म बनवते. कंपनीकडे भारतात व अमेरिकेत डाइड पॉलिस्टर फिल्मसाठी पेटंटेड तंत्रज्ञान आहे आणि असे तंत्रज्ञान असणारी ही दुसरी कंपनी आहे. कंपनीकडे को-एक्स्ट्रुजम, कोरोना ट्रीटमेंट, ऑन-लाइन व ऑफ-लाइन कोटिंग, इ. सुविधा आहेत.

Related posts

Revisão Do Cassino Online Confiável Pin Up

mumbainewsexpress

Sputnik V approved for use in Slovakia

This International Yoga Day and World Music Day immerse yourself in the River of Health & Happiness

Leave a Comment

4 + 1 =