by Suman Gupta
गणेश विसर्जन करतेवेळी अनेक भाविक समुद्राच्या खोल पाण्यात उतरतात अशावेळी भाविकांच्या जीवितास धोखा निर्माण होऊ शकतो तसेच विसर्जन करतेवेळी अनेक भाविक मुर्ती समवेत निर्माल्य देखिल पाण्यात विसर्जीत करतात. इतक्या मोठ्या प्रमाणात समुद्राच्या पाण्यात निर्माल्य विसर्जन केल्याने पाण्याचे प्रदुषण होऊन समुद्रातील जीवांना धोखा निर्माण होतो या सर्व बाबींची दखल घेत.
विसर्जना दरम्यान कोणत्याही भाविकाच्या जीवितास धोखा निर्माण होऊ नये व समुद्राच्या पाण्याचे होणारे प्रदुषण टाळण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदा देखिल अनेक स्वयंम सेवी संस्थानी मुंबई मधील वेगवेगळ्या चौपाट्यांवर जलजीव रक्षकांसह सेवा बजावली. चौपाट्यांवर उपस्थित असलेले हे सर्व जलजीव रक्षक अनेक छोट्या-छोट्या गणेश मुर्त्यां बोटींवरून खोल समुद्रात घेऊन जात विसर्जन करत होते.
उपस्थित जलजीव रक्षकांचा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासा कडून विमा उतरविण्यात आला होता व सर्व जलजीव रक्षकांना न्यासाकडून टि-शर्ट देखिल पुरविण्यात आले होते. दिवस-रात्र व पहाटे उशीरा पर्यंत सेवा बजावणारया सर्व जलजीव रक्षकांच्या चहा पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था देखिल श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासा तर्फे करण्यात आली होती.
चौपाट्यांवर कार्यरत असणारया जलजीव रक्षकांच्या कार्याच्या पाहणीसाठी व न्यासातर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे सर्वश्री विश्वस्त मा.श्री. राजाराम देशमुख यांनी वेगवेगळ्या चौपाट्यांवर भेट दिली व गणेश भक्तांच्या सेवेसाठी उपस्थित सर्व जलजीव रक्षकांशी संवाद साधला यावेळी न्यासाचे उप – कार्यकारी अधिकारी श्री संदीप राठोड देखिल उपस्थित होते.