Uncategorized

द स्पोर्ट्स गुरुकुलकडून स्कुलाथॉनचे आयोजन

by Suman Gupta

मुंबई : द स्पोर्ट्स गुरुकुलकडून स्कुलाथॉनचे आयोजन करण्यात येणार असून संपूर्ण भारतात स्पर्धा होणार आहेत. पुढच्या पिढीसाठी अॅथलेटिक आणि सदृढ आयुष्याच्या सवयी लावण्याचा या स्कुलाथॉनचा उद्देश आहे.स्कुलाथॉन हा मूळ मॅरेथॉनचा छोटा प्रकार असेल. विशेष करून शाळेतील लक्षात ठेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

 स्कुलाथॉनचा सध्याचा हंगाम अहमदाबाद, हैदराबाद व मुंबई येथे आयोजित केला जाणार आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर याची घोषणा करण्यात आली. यु टू कॅन रनसोबत द स्पोर्ट्स गुरुकुल असणार असून रेसच्या व्यवस्थापनासाठीच्या सुविधेसोबतच स्पर्धा आयोजन देखील त्यांच्याकडून करण्यात येणार आहे.

  द स्पोर्ट्स गुरुकुलचे संस्थापक जय शाह म्हणाले की, युवांमध्ये फिटनेस बाबत जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने द स्पोर्ट्स गुरुकुल यांनी स्कुलाथॉनच्या दृष्टीने आणखीन एक पाऊल टाकले आहे.यु टू कॅन रन सोबत स्पर्धा व्यवस्थापनासाठी आम्ही एकत्र आल्याने आनंदी आहोत. येणाऱ्या काळात पॅन इंडिया स्तरावर स्पर्धेच्या आयोजनाचा आमचा विचार आहे.

स्कुलाथॉन मालिकेत वेगवेगळे गट असणार आहेत.  जेणेकरून 5 ते 15 वर्ष वयोगट असणाऱ्या मुलांना सध्याच्या गॅजेट्सच्या जमान्यात या स्पर्धांच्या माध्यमातून पुन्हा एकदा छोट्या अंतराच्या स्पर्धांच्या माध्यमातून मैदानात उतरता येईल.द स्पोर्ट्स गुरुकुल ही भारतातील फिजिकल फिटनेस, व्यावसायिक स्पोर्ट्स आणि फिटनेस डेव्हलपमेंट सुधारण्यात आघाडीवर आहे. द स्पोर्ट्स गुरुकुल मार्फत  भारतातील 150 हुन अधिक शाळा व एक लाख हून अधिक मुलांना स्पोर्ट्स आणि फिटनेसच्या जागृतीचे कार्य केले जाते.

www.schoolathon.on

Related posts

Airtel Payments Bank launches ‘Rewards123’ Digital Savings Account

mumbainewsexpress

Casino Bonus Abgerechnet Einzahlung 2023 Neue Sofort Boni

mumbainewsexpress

Leave a Comment

63 − 61 =