Entertainment

उदय टिकेकर यांचे मराठी वाहिनीवर पुनरागमन.

by Suman Gupta

मराठी, हिंदी सिनेमा आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे उदय टिकेकर. आता उदय टिकेकर एका मराठी वाहिनीवरील मालिकेतून पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत.

उदय टिकेकर यांचे मराठी वाहिनीवर पुनरागमन झालेले नुकतेच प्रेक्षकांनी पाहिले.  एका मराठी मालिकेतील नायकाच्या वडिलांची भूमिका आता उदय टिकेकर साकारत आहेत. आपल्या सुनेच्या मागे वडीलांप्रमाणे नेहमी खंबीर उभा राहणाऱ्या, शिस्तप्रिय, प्रेमळ, सगळ्यांना समजून घेणारा पण वेळप्रसंगी खडसावून सांगणारा अश्या पात्राच्या भूमिकेला टिकेकर योग्यतो न्याय देतील अशी आपल्या सर्वाना खात्री आहे. नवीन मालिका आणि नवीन सहकलाकारांन बरोबर टिकेकर नवीन प्रेक्षकवर्ग निर्माण करतील आणि त्यांच्या मनात आणखी एका नव्या पात्राच्या रूपाने घर करून राहतील एवढं मात्र नक्की.

यावर उदय टिकेकर म्हणाले “नेहमीच मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतात, देवाच्या कृपेने आईवडिलांच्या कृपेने आणि प्रेक्षकांच्या आशीर्वादाने मला आणखीन एकदा वेगळी अनोखी भूमिका करायला मिळतीये. खूप आनंद होतोय मला आणखीन एकदा वेगळी भूमिका करण्यात. आजपर्यंत साकारलेल्या कॅरॅक्टरपेक्षा अतिशय वेगळं कॅरॅक्टर आहे, दिसायलाही वेगळं आहे स्वभावात ही वेगळं आहे, अनेक रंग अनेक पैलू आहेत त्या कॅरॅक्टरला. साधारण चार एक भाग माझे झालेत आणि प्रेक्षकांचा इतका प्रचंड प्रतिसाद मला मिळालाय, इतके फोन्स इतक्या शुभेच्छा मला मिळाल्यात. सगळ्यांचा मी आभारी आहे. असेच वेगवेगळया भूमिका साकारण्याचा प्रयत्न देवाच्या कृपेने आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने मी चालू ठेवीन.”

Related posts

Dia Mirza marks her digital debut with ‘Kaafir

#PCMania engulfs Mumbai! Priyanka Chopra’s fans shower her with love at a recent event

mumbainewsexpress

7 cool things you can try with Alexa on your Fire TV device 

Leave a Comment

79 − 75 =